Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार केला
Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार केलाStock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार केला

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांची संख्या पार केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

Stock Market News : देशभरात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर गुजरातने मोठी झेप घेत 1 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनीच ही संख्या गाठली होती. त्यामुळे गुजरात हे तिसरे राज्य ठरले आहे, अशी माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मार्फत देण्यात आली. या तीन राज्यांचा मिळून देशातील एकूण गुंतवणूकदारांमध्ये सुमारे 36 टक्के वाटा आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यात या राज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते आहे.

मे 2025 पर्यंतची आकडेवारी:

देशभरात नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या आता सुमारे 11.5 कोटींवर पोहोचली आहे. यातील एकट्या मे महिन्यात 11 लाख नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात नोंदणी केली आहे. मागील चार महिन्यांत घट होत असतानाही मे महिन्यातील ही वाढ 9 टक्क्यांची सुधारणा दर्शवते.

प्रादेशिक चित्र:

उत्तर भारत – 4.2 कोटी गुंतवणूकदार

पश्चिम भारत – 3.5 कोटी

दक्षिण भारत – 2.4 कोटी

पूर्व भारत – 1.4 कोटी

वाढीचा वेग थोडा मंदावला:

फेब्रुवारी 2024 मध्ये देशाने 9 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठल्यानंतर, पुढील काही महिन्यांत दर 5 ते 6 महिन्यांनी 1 कोटी नव्या गुंतवणूकदारांची भर पडत होती. ऑगस्ट 2024 मध्ये 10 कोटी आणि जानेवारी 2025 मध्ये 11 कोटींवर संख्या पोहोचली. मात्र फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान दरमहा सरासरी 10.8 लाख नवीन गुंतवणूकदारांचीच नोंद झाली, जे मागील वर्षीच्या 19.3 लाखांच्या सरासरीपेक्षा लक्षणीय कमी आहे. तरीसुद्धा, मे महिन्यात झालेली वाढ पुन्हा बाजारातील हालचाल दर्शवत असून, देशात गुंतवणुकीविषयी नागरिकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे.

हेही वाचा...

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार केला
Stock Market Update : इराण-इस्रायल युद्ध थांबलं अन् शेअर मार्केट वधारलं! सेन्सेक्ससह निफ्टीने केला विक्रम
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com