ताज्या बातम्या
नाशिकमधील पेसा भरती संदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मागे
नाशिकमधील पेसा भरती संदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महेश महाले, नाशिक
नाशिकमधील पेसा भरती संदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जे पी गावित पेसा भरती संदर्भात 7 दिवसांपासून उपोषण करत होते. आता हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदिवासी शिष्टमंडळाची बैठक झाली.
15 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर देऊ असे एकनाथ शिंदे यांचे आश्वासन दिलं. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आलं.
यासोबतच 15 सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सर्व आदिवासी लोकप्रतिनिधींना घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा देखील इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.