Gujarat Kabra Jewel : मालकाच्या आनंदाचा अनोखा अंदाज, टार्गेट पूर्ण झाल्यावर स्टाफला दिल्या गाड्यांच्या चाव्या
आपल्या कर्मचाऱ्यांनी दिलेलं टार्गेट पुर्ण केल्यावर कंपनीचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी पगारवाढ करतो किंवा जास्तीत जास्त त्याला एखादी भेटवस्तू देऊ शकतो. पण गुजरातच्याच खेडा जिल्ह्यातील एका ज्वेलर कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांनी दिलेले टार्गेट पुर्ण केले म्हणून आनंदाच्या भरात चक्क नव्या कोऱ्या कार वाटल्या आहेत. दोन भावांनी 2006 मध्ये वयवर्ष 20 असनाता काबर ज्वेल्सची सुरुवात केली होती. सध्याच्या घडीला के के ज्वेल्समध्ये 140 कर्मचारी काम करतात.
त्यांच्या कंपनीत सुरुवातीला अवघे 12 कर्मचारी काम करत होते त्यावेळी त्यांच्या कंपनीत दोन कोटी रुपयांचा धंदा झाला होता. त्यानंतर त्या दोन्ही भावांनी असं ठरवलं होत की आपली कंपनी 200 कोटींचा टप्पा ज्यावेळेस पार पाडेल त्यावेळेस आपण कर्मचाऱ्यांसोबत मिळून जंगी सेलिब्रेशन करायचं. त्यांच हे स्वप्न पुर्ण झाले आहे. तीन महिन्यांपूर्वीच या कंपनीचा आयपीओ आला, त्यामुळे कैलास काबरा यांनी कंपनीतील 12 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 700, टोयोटा ईनोव्हा, हुंदाई आय10, एक्स्टर, मारुती अर्टिगा, ब्रेझा या कार गिफ्ट केल्या आहेत.
याबद्दल कंपनीच्या मालकाने माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, "माझ्या कर्मचाऱ्यांशिवाय हे टार्गेट पुर्ण करण कठीण होत. सुरुवातीच्या काळापासून जे कर्मचारी कंपनीसाठी काम करत होते, त्यांना माझ्याकडून काहीतरी देणं लागत होते". त्याचसोबत त्यांनी हे देखील सांगितलं की,"दिवाळीला बोनस म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करोडो रुपयांच्या कार वाटणारे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत आहेत". अखेर सरत्या आर्थिक वर्षात काबरा बंधुंनी त्यांचा संकल्प त्यांनी पूर्ण केला.