Highway Road : 'महामार्ग बांधणीचा वाढणार वेग, रोज 60km बांधले जाणार रस्ते'; नितीन गडकरी यांची माहिती

Highway Road : 'महामार्ग बांधणीचा वाढणार वेग, रोज 60km बांधले जाणार रस्ते'; नितीन गडकरी यांची माहिती

जलदगतीने देशातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, महामार्ग बांधकामाचा वेग वाढवण्याचे एक मोठे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
Published by :
Varsha Bhasmare
Published on

जलदगतीने देशातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, महामार्ग बांधकामाचा वेग वाढवण्याचे एक मोठे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, भविष्यात देशात दररोज ६० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. न टाइम्स नेटवर्कच्या “इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह २०२५” मध्ये त्यांनी हे विधा केले. गडकरी यांच्या मते, आर्थिक विकासालाही चांगले रस्ते नेटवर्क केवळ प्रवास सुलभ करणार नाही तर गती देईल.

भारतमाला प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत सध्या कोणतेही नवीन प्रकल्प सुरू झालेले नाहीत, त्यामुळे काही काळ महामार्ग बांधकामाचा वेग मंदावला असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. मात्र, नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर महामार्ग बांधकाम पुन्हा वेग घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारचा उद्देश स्पष्ट असून, महामार्ग बांधकामाचा वेग सातत्याने वाढवणे, लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळकटी देणे, असे त्यांनी सांगितले.

ऑटोमोबाईल उद्योगाला जगातील नंबर वन बनवण्याची तयारी

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पुढील आठ ते दहा वर्षांत भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला जगातील आघाडीचा ऑटोमोबाईल उद्योग बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आकडेवारीचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की अमेरिकेतील ऑटोमोबाईल उद्योग सध्या अंदाजे ₹७८ लाख कोटी, चीनमधील ₹४७ लाख कोटी आणि भारताचा ₹२२ लाख कोटींचा आहे. गडकरी यांच्या मते, चांगले रस्ते, मजबूत पायाभूत सुविधा विकसित करून आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत या क्षेत्रात लक्षणीय झेप घेऊ शकतो.

शेतीवर लक्ष केंद्रित केल्याने GDP वाढेल

देशाच्या जीडीपीमध्ये वेगाने वाढ करण्यासाठी कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावरही गडकरी यांनी भर दिला. शेतकऱ्यांना रस्ते आणि वाहतुकीच्या विकासाचा थेट फायदा होईल, ज्यामुळे त्यांचे उत्पादन बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या मते, पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल उद्योग आणि शेतीवर एकत्र काम करून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करता येते. जलद महामार्ग बांधकाम हा देशाच्या विकासाचा कणा ठरेल असा सरकारचा विश्वास आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com