पुण्यातील राजकीय नेत्यांना खंडणीची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यातील राजकीय नेत्यांना खंडणीची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यात राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात भाजपाचे आमदार महेश लांडगे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. 

या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला.

त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली. पण जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे अविनाश बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्या यातूनच याला घोरपडी येथून पुन्हा अटक करण्यात आलीय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com