ताज्या बातम्या
आजपासून 3 दिवस सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील रस्ता बंद
आजपासून 3 दिवस सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आजपासून 3 दिवस सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 23 सप्टेंबर आणि 25 व 26 सप्टेंबर हे तीन दिवस सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील रस्ता बंद राहणार आहे.
आता नवरात्र उत्सव सुरु होणार आहे. नवरात्री निमित्त भाविक मोठ्या संख्येने सप्तश्रृंगी देवीच्या गडावर दर्शनाला येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
नवरात्री 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. दरड प्रतिबंधक जाळी बसवण्याचे काम प्रशासनाकडून केलं जाणार आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गडावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.