Nagpur News : राज्यात पाठ्यपुस्तकांमध्ये नवा घोटाळा! इयत्ता पहिली, दुसरीच्या पुस्तकात एकच कविता; अभ्यासक्रमात हलगर्जीपणा?
सध्या राज्यात शिक्षण विभागात अनेक विषय चर्चेचा विषय ठरले आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतलेला, इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. यावरुन राजकीयवर्तूळात मोठ्याप्रमाणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. त्यात मनसे नेते राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा विषय अधिक जोर धरत धरुन ठेवला.
अशातच हा वाद सुरु असताना आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा नवा घोटाळा नागपुरमधून समोर आला आहे. नागपुरमध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता असल्याचं समोर आलं आहे. इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात 28 क्रमांकाच्या पानावर असलेली "Birds can Fly" ही कविता इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पान क्रमांक 16 वर हुबेहुब छापून आली आहे. यामध्ये केवळ चित्र बदलण्यात आले आहेत. दरम्यान प्रत्येक इयत्तेचे पुस्तक छापण्यासाठी एक समिती नेमले जाते.
विद्यार्थ्यांना शिकवल्या जाण्याऱ्या पाठ्यपुस्तकात कोणते धडे आणि कविता असायला हव्या याचा अभ्यास आणि निर्णय या समितीकडून केला जातो. अस असताना देखील दोन्ही वर्गात एकच कविता छापण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. यामागे काही तांत्रिक अडचण होती की कॉपी पेस्ट करण्याचा प्रकार आहे? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. यामगचं नेमक कारण हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही.