Geotagging : जिओ टॅगिंगद्वारे राज्यातील शाळांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध
राज्यातील सर्व शाळांचे आणि अंगणवाडीचे कामकाज कसे चालते हे नियंत्रित करण्यासाठी शिक्षण विभागाचे विशेष प्रयत्न चालू आहेत त्यासाठी शाळा आणि अंगणवाडी यांची माहिती जिओ टॅगिंगच्या ॲपच्या माध्यमातून एकत्रित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यातील शाळांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी यांच्या कामकाजावर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष असणार आहे.
राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना आपली माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित शाळांनी भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांबाबतची संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या यूडीस प्लस या पोर्टलवर उपलब्ध केली गेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती ? शिक्षकांची संख्या किती ?शाळांमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? . संगणकीय सुविधा यांची माहिती या अँप मध्ये दिली जाणार आहे.
शासकीय योजनांमध्ये जेव्हा शैक्षणिक धोरण जाहीर होते तेव्हा या माहितीचा खुप उपयोग होतो. यासाठी हे अँप निर्माण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेशी करार करण्यात आला आहे. ही संस्था माहिती गोळा करून त्यांचे एकत्रीकरण करणार आहे. त्या द्वारे स्वतंत्र डॅशबोर्डची ही निर्मिती करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी एकुण 1 कोटी 4 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याद्वारे राज्यातील शाळा आणि'अंगणवाडी यांच्यात योग्य तो समन्वय साधला जाऊन त्या माहितीचा शैक्षणिक क्षेत्रात वापर करून शिक्षण अधिक समृद्ध करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न चालू आहेत.