बारावीच्या उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा अखेर शोध लागलाच
Admin

बारावीच्या उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा अखेर शोध लागलाच

बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्याचं प्रकार समोर आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्याचं प्रकार समोर आला होता. या संपूर्ण 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लावण्यात आला आहे. हे दोघे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात उध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उसारे राहुल भगवानसिंग, मनीषा भागवत शिंदे असे आरोपींचे नावं आहेत.

या सर्व प्रकरणात बोर्डाने एक चौकशी समिती नेमली होती. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com