ताज्या बातम्या
Maharashtra Politics : साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपाच्या वाटेवर
राजकीय उलथापालथ: साताऱ्यात सत्यजीत पाटणकर भाजपात, शरद पवार गटाला मोठा धक्का.
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच साताऱ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजीत पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.