Nitesh Rane : अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याचं प्रकरण, नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा
भाजप मंत्री नितेश राणेंवर सरकारी अधिकाऱ्यावर मासा फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप होता. अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप मंत्री नितेश राणे आणि इतर 30 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (सिंधुदुर्ग) यांच्या न्यायालयाने 21 मे रोजी निकाल दिला, ज्याची माहिती रविवारी उपलब्ध झाली. त्यामुळे नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
यादरम्यान न्यायालयाने पुराव्यानुसार म्हटले आहे की, "अधिकाऱ्याने आपल्या साक्षीत असे म्हटले नाही की, राणेंनी मासे त्याच्यावर फेकले. राणेंसोबत असलेल्या लोकांनी अधिकाऱ्यावर मासे फेकले. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे".
तर नितेश राणे म्हणाले की, "मी समाधानी आहे, आम्हाला न्याय दिल्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. पारंपारिक मच्छीमारांवर सातत्याने होणारा अन्याय यामुळे मी कोळी बांधवासाठी आंदोलन केले होते."