Mumbai Aarakshan : मुंबई पालिकेची आरक्षण सोडती नोव्हेंबरमध्ये?
थोडक्यात
राज्यातील 29 महापालिकांच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लागली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज (27 ऑक्टोबर) 28 महापालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत 28 किंवा 29 ऑक्टोबरला जाहीर होईल.
Mumbai (BMC) Aarakshan : राज्यातील 29 महापालिकांच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (27 ऑक्टोबर) 28 महापालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत 28 किंवा 29 ऑक्टोबरला जाहीर होईल, आणि प्रत्यक्ष आरक्षण सोडत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे 12 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर कायदेशीर अडचणीमुळे निवडणुका साडेतीन वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासन आणि निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
