Supreme Court : "भारत धर्मशाळा नाही" सुप्रीम कोर्टाकडून निर्वासिताला देश सोडण्याचे आदेश

सुप्रीम कोर्टाकडून एका निर्वासिताला "भारत धर्मशाळा नाही आम्ही आधीच 140 कोटी लोक आहोत" असं म्हणत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत.
Published by :
Prachi Nate

सुप्रीम कोर्टाकडून एका निर्वासिताला देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. भारत धर्मशाळा नाही, जगभरातून आलेल्या निर्वासितांना भारतात आश्रय का द्यावा? आम्ही आधीच 140 कोटी लोक संघर्ष करत आहोत. प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या निर्वासितांना आश्रय देऊ शकत नाही. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार तो श्रीलंकेचा नागरिक असून भारतात व्हिसावर आला होता. त्यांच्या देशात त्याच्या जीवाला धोका असल्याचंही त्याने सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com