Admin
बातम्या
स्वराज्य संघटना लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार - संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पार पडली.
संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पार पडली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेण्यात आली.
या जाहीर सभेदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. यासोबतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करत सरकारने अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केलीये.