World No Tobacco Day 2025

World No Tobacco Day 2025: धूम्रपान सोडा, तुमचे जीवन वाचवा

World No Tobacco Day : तंबाखूच्या धोकादायक प्रभावांवर प्रकाश टाकणारा दिवस.
Published by :
Team Lokshahi
Published on

दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन World No Tobacco Day साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा दिवस शनिवारी असून, जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यावतीने घोषित करण्यात आलेली थीम आहे. “भ्रमाचा भंग: तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या उद्योगाच्या युक्त्यांचा पर्दाफाश.” हा दिवस तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक गंभीर परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि तंबाखूमुक्त जग घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संदेश देतो. तंबाखू विरोधी ही जागतिक चळवळ 1987 मध्ये WHO ने सुरू केली होती. 1988 पासून 31 मे हा दिवस अधिकृतपणे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा होऊ लागला.

1998 मध्ये टंबाको-फ्री इनिशिएटिव्ह (TFI) सुरू करून WHO ने तंबाखूविरोधी धोरणांना अधिक बळ दिले. 2008 मध्ये तर त्यांनी तंबाखू Tobacco उत्पादनांच्या जाहिरातींवर पूर्णतः बंदी घालण्याचे आवाहन केले, जेणेकरून विशेषतः तरुणांमध्ये तंबाखूची वाढती लोकप्रियता रोखता येईल. 2025 मध्ये साजरा होणारा हा दिवस तंबाखू व निकोटीन कंपन्यांच्या धोरणांवर प्रकाश टाकणार आहे. आज विविध स्वाद, आकर्षक पॅकेजिंग आणि रासायनिक बदल करून हे उत्पादने अधिक रुचकर आणि आकर्षक बनवली जातात, ज्यामुळे युवकवर्ग त्याकडे आकृष्ट होतो. या पार्श्वभूमीवर शाळा School , महाविद्यालये college , आरोग्य संस्था Health Institution, सामाजिक संस्था Social Institution आणि प्रशासन Administration यांनी एकत्र येऊन तंबाखूविरोधी Anti-tobacco उपक्रम राबवून या मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com