ताज्या बातम्या
Kashi Vishwanath Mandir : काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना पगारवाढ; 30 हजारांचा पगार थेट 90 हजार
उत्तर प्रदेशमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे.
उत्तर प्रदेशमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना पगारवाढ होणार आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना 200 टक्के पगारवाढ मिळणार आहे.
पुजाऱ्यांचे मासिक वेतन, जे आतापर्यंत सुमारे 30 हजार रुपये, ते आता नवीन नियमांनुसार जवळजवळ तिप्पट होईल. म्हणजेच 30 हजारांचा पगार थेट 90 हजार होणार आहे. त्याचसोबत नुकत्याच पार पडलेल्या 108 व्या बैठकीत, श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने इतर अनेक प्रस्तावांना मान्यता दिली आहे. गेल्या चार दशकांतील पुजाऱ्यांच्या सेवा नियमांत ही पहिली मोठी सुधारणा आहे.