ताज्या बातम्या
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहोचला 71 टक्क्यांवर
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहोचला 71 टक्क्यांवर पोहचला आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहोचला 71 टक्क्यांवर पोहचला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जायकवाडी धरणात 40 हजाराहून अधिक क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विजय काकडे हे वाढत्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे.
नगर आणि नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 71 टक्क्यांवर पोहोचला आहे.