संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

संसद भवन सचिवालयाने संसद भवनातील सोफ्यांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात खासदार आणि मान्यवरांच्या सोयीसाठी ठेवलेल्या सोफ्यांवर बसून वेळ घालवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

संसदेचे पहिलेच अधिवेशन असेल ज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. केंद्र सरकारकडून त्या विधेयकांची यादी तयार केली जात असून, ती चालू अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com