ताज्या बातम्या
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. ते प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती.
त्यानंतर आता ठाणे पोलीस आयुक्तांना अहवाल तातडीने मागविला आहे. पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र आता महिला आयोगाने याची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आदेश दिले आहेत.