पब्जी गेमच्या नादात युवकाने विषप्राशन करून संपवले जीवन

पब्जी गेमच्या नादात युवकाने विषप्राशन करून संपवले जीवन

पब्जी गेम खेळण्याच्या नादात विषप्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली असून ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे या गावात एक घडली आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सतेज औंधकर,कोल्हापूर

पब्जी गेम खेळण्याच्या नादात विषप्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली असून ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे या गावात एक घडली आहे. हर्षद डकरे (वय वर्ष 19)असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पब्जी खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर तरुणानं टोकाचं पाऊल उचलल असल्याचे बोललं जात असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशात अनेक ठिकाणी पब्जी गेम मुळे अहत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या या गेम च्या व्यसनाने अनेक युवक आपल्या जीवाला मुकले यामुळे शासनाने ही यावर बंदी आणली मात्र अद्याप ही काही मोबाईल वर हा गेम सुरू आहे. हे व्यसन अनेक युवकांना लागलं आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील घानवडे गावात ही अशीच एक घटना घडली आहे. एका युवकाने पब्जी खेळण्यावरून झालेल्या वादातून विषप्राशन करून आपले जीवन संपवले आहे. हर्षद डकरे असे या युवकाचे नाव असून तो फक्त 19 वर्षाचा होता. हर्षद हा गेल्या काही दिवसांपासून सतत पब्जी गेम खेळत होता त्याला पब्जी खेळण्याचं व्यसन लागलं होतं.

पब्जी गेम खेळू नको असे त्याचे कुटुंबीय वारंवार सांगायचे आज सकाळी ही घरात वाद झाला. आणि त्याने रागाच्या भरात घर सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेला. मात्र अनेक वेळानंतर ही तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांकडून शोधाशोध सुरू झाली. दरम्यान हर्षदने विष प्राशन केले आणि तेथेच पडला कुटुंबातील सदस्यांना याबाबत समजल्यानंतर हर्षद याला तातडीने सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात उपचार सुरू असताना हर्षद याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com