Eknath shinde : ...तो फिर मे खुद की भी नहीं सुनता... उपमुख्यमंत्री शिंदेंचं बैलगाडा शर्यतीत वक्तव्य
बैलगाडा शर्यती महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत असून, त्यांची उलाढाल १०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ही उलाढाल लवकरच ५०० ते १००० कोटींपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ वेग नाही, तर तो शेतकऱ्यांचा त्यांच्या लाडक्या बैलांशी असलेला जीव्हाळ्याचा संबंध आणि गोधनाचा आदराचा उत्सव आहे. पूर्वी कोर्टाने या शर्यतींवर बंदी घातली होती, परंतु महायुती सरकारने हे शर्यती सांस्कृतिक ठेवा असल्याचे पटवून देत बंदी उठवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
मै एक तो कमिटमेंट करता नाही,और एक बार कमीटमेंट कर दी,तो फिर खुद्द की भी नही सुनता,अशी डायलॉगबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे,हा शब्द दिला की शब्द पूर्ण करतो,बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा,आणि एकदा शब्द दिला की तो पाळा,त्यामुळे मी एकदा शब्द दिला,की माघारी नाही,असं डायलॉग शिंदेंनी मारला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्याकडून सांगलीच्या बोरगाव मध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी एक डायलॉग बाजी केली आहे. तसेच बैलगाडी शर्यतींचा हा उडालेला धुरळा पाहता घोडयाच्या शर्यती जश्या ओलांम्पिक मध्ये पोहचल्या आहेत,तश्या बैलगाडी शर्यत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली पाहिजे, असं मत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
