ताज्या बातम्या
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या 'या' वक्तव्यामुळे सभागृहात हश्या पिकला...
संजय शिरसाट: बॅग उघडीच आहे, विधानावर सभागृहात हश्या पिकला.
मंत्री संजय शिरसाठ यांचा एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर एक बॅग आहे आणि त्या बॅगेत पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, यावर एका कार्यक्रमात बोलताना पैसे कमी पडल्यास माझी बॅग उघडी आहे असे शिरसाट यांनी वक्तव्य केले.“डीजेऐवजी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर द्या. ऐकायला, पाहायला छान वाटते. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही,” असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावरून केलेल्या या कोपरखळ्यांवर सभागृहात एकच हशा पिकला. शिरसाट यांच्या या विधानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आनंदाची प्रतिक्रिया उमटली. सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी ते नेहमीच तयार असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.