ताज्या बातम्या
महागाईची झळ; डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
महागाईचा वाढता आलेख पाहायला मिळतो आहे.
महागाईचा वाढता आलेख पाहायला मिळतो आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यातच आता डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या देशातील पेरणीच्या आकडेवारीत डाळीच्या लागवडीचे क्षेत्र घटले आहे.
देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या चार लाख टनाची घट असणार आहे. एक ते दीड महिन्यापासून सर्व प्रकारच्या किराणा मालाचे भाव जास्त आहेत. यावर्षी सर्व प्रकारच्या डाळीच्या लागवडीचे क्षेत्र नऊ टक्के घटले आहे .