BJP - ShivSena : पुण्यात भाजप-शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता! शिंदे गटातील नेत्याची भाजपच्या बड्या नेत्यावर टीका
पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तावली जात आहे. रवींद्र धंगेकर यांची तक्रार थेट शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत यांच्यावर असे आरोप करणे अशोभनीय असल्याचं देखील भाजप नेते म्हणाले आहेत. निलेश घायवळ आणि समीर पाटील प्रकरणावरुन रविंद्र धंगेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती.
यावेळी धंगेकर म्हणाले होते की, "निलेश घायवळपासून ते चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसपर्यंत कोण मदत करतो आहे? याच्या पोटातले सगळे.... म्हणजे हे काय एक प्रकरण नाही आहे. हे काय निलेश घायवळ सचिन घायवळ तुम्ही जे काय नाव घेता ते नाही. याच्यामध्ये महाराष्ट्रात ही गुन्हेगारी चालवतो कोण? पुणे जिल्ह्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली किंवा समीर पाटील... मगं हा समीर पाटील काय करतो? मग याच्यात हे सगळे प्रकरण येणार आहे. एकाही माणसाला आपण सोडणार नाही आहोत".
यावर भाजप नेत्यांचा संताप उफाळला असून त्यांनी रवींद्र धंगेकर आताच शिवसेनेत आले आहेत त्यांनी असे आरोप करू नये, असा इशारा धंगेकरांना दिला आहे. त्याचसोबत जर ते असंच वागत राहिले तर आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांची तक्रार करणार असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांना समज देण्यात यावी असं देखील म्हटलं गेलं आहे.
त्यानंतर भाजप नेत्यांनी धंगेकरांना इशारा दिल्यानंतर रविंद्र धंगेकर प्रत्युत्तर करत म्हणाले की, "सचिन घायवळ याला गृहराज्य मंत्र्यांनी परवाना दिला हे चूक आहे. चूक दुरुस्ती होऊ शकते. शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी योगेश कदम यांच्यावरच टीका केली. पुढे ते म्हणाले की, सचिन घायवळ याला परवाना देण्यासाठी शिफारस कुणी दिली याची चौकशी झाली पाहिजे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे एकच आहे, त्यांना कोण पोसत हे सगळ्याना माहिती आहे. सचिन घायवळ शस्त्र परवान्यावरून धंगेकर यांचा पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा. एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपने माझी तक्रार केली तरी शिंदे साहेब माझ्या बाजूनेच असतील. मी पुणेकरांसाठी लढतोय."