Sada Sarvankar : सदा सरवणकर यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय नेते काय म्हणाले?

सदा सरवणकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सरवणकर यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Published by :
Team Lokshahi

सदा सरवणकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सरवणकर यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानाचे राजकीय स्तरांवर पडसाद उमटत आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर टीका केलीये.

तर 20 कोटींचा निधी जातो कुठे? असा सवाल महेश सावंत यांनी सवाल केला आहे. सदा सरवणकर यांच्या या विधानामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. याआधीही विरोधकांनी सरकारवर निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला होता.

आता एका सत्ताधारी नेत्यानेच केलेल्या या विधानामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावर आता सदा सरवणकर काय स्पष्टीकरण देतात आणि सत्ताधाऱ्यांकडून सरवरणकरांच्या वक्तव्याची कशी पाठराखण केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com