लव्ह जिहादसाठी कायदा करण्याची गरज नाही - दिलीप वळसे पाटील

लव्ह जिहादसाठी कायदा करण्याची गरज नाही - दिलीप वळसे पाटील

शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे. ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे. ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल. त्यात काही त्रुटी आहेत. त्यातूनही मार्ग निघेल मात्र लव जिहाद हा विषय राजकीय असल्याने त्यासाठी कायदा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

एकीकडे राज्यात लव जिहाद च्या विरोधात मोर्चे निघतायत. हा कायदा केला जावा यासाठी आमदार नितेश राणे यासाठी आग्रही असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र घटनेमध्ये कोठेही विषय नाही. त्यामुळे या विरोधात कायदा करणे घटनेशी कितपत सुसंगत आहे या बाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com