Manoj Jarange : ...हत्येच्या कटप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे; जरांगेंची फडणवीसांकडे मागणी
थोडक्यात
...हत्येच्या कटप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे
जरांगेंची फडणवीसांकडे मागणी
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांना मराठा समालाजा आरक्षणाची मागणी करणारे जीवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात 2.5 कोटी रुपयांची डील झाली होती. असा धक्कादायक खुलासा झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु असून या डीलमागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता होता. आरोप करत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नावं घेतले आहे. त्यानंतर आता पुन्हा जरांगे यांनी अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे यावर गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. बीडचा कांचन साळवी आरोपी माझ्या घातपात कटप्रकरणात नसल्यास तो 4-5 दिवस फरार का होता? असा सवाल जरांगेंनी केला आहे. या कटप्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरूण घालणं थांबवा; अन्यथा 2029 ला मी तुम्हाला महागात पडेन, असा इशाराही दिला आहे. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं, असं म्हणत धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलक यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप होत आहे. (Jarange) जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, जालना पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन संशयितांना अटक केलं आहे. अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या संशयित आरोपींची नावे आहेत.बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावातील अमोल खुणे हा रहिवासी आहे.
