अडीच वर्ष सरकार होतं, पण मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा नव्हता; जयंत पाटलांची खंत
Team Lokshahi

अडीच वर्ष सरकार होतं, पण मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा नव्हता; जयंत पाटलांची खंत

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही याबद्दलची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
Published by :
shweta walge

अमोल धर्माधिकारी, पुणे

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही याबद्दलची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. पुरंदर पब्लिसिटीच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर कॉफी टेबल बुक तयार करण्यात आला आहे. त्याच्या प्रकाशन समारंभात जयंत पाटील बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील?

अडीच वर्ष आपलं सरकार होतं. पण आम्ही कुणालाच काही देऊ शकलो नाही. त्याच कारण म्हणजे मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा नव्हता. सरकारमध्ये एक नंबरलाच आपला माणूस पाहिजे. आपला मुख्यमंत्री असेल तर आपल्याला पाहिजे तसं सरकार चालतं. महाविकास आघाडी सरकार होतं. मित्र पक्षाशी आमचं चांगलं जमायचं. मात्र सगळ्यानां सोबत घेऊन एकमत होण्यात कधी अडचणी यायच्या.

पुढे ते म्हणाले, शिर्डी येथे होणाऱ्या शिबिरात शेवटच्या दिवशी शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी फ्रंट सेलचे अध्यक्ष शिबिराला उपस्थित असणार आहेत. शिबिरात विविध वकत्यांच मार्गदर्शन होणार आहे. पक्षाचं ध्येयधोरणे तसेच सध्याच्या देशातील परिस्थितीवर चर्चा होणार आहे.

'बूँद से जो गयी वो हौदसे नही आती' रोजगार मेळाव्यावर जयंत पाटलांची टीका

फॉक्सकॉनसारखे अनेक प्रकल्प जायला लागले त्यामुळे काही तरी घोषणा राज्यासाठी गरजेचे आहे, गुजरातला आता आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे तूर्त महाराष्ट्राला शांत करण्यासाठी घोषणा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काय होईल याबदल माहीत नाही, अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे.

अडीच वर्ष सरकार होतं, पण मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा नव्हता; जयंत पाटलांची खंत
...त्यामुळे मी आता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाही : नितीन राऊत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com