मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आठ तासांचा विलंब होणार
मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे.पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या 9 विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
कामे पूर्ण करीत असताना त्या दरम्यान बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करून 1910 दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जल वाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आठ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
आज सकाळी 10 पासून पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते मात्र दुरुस्ती कामांना विलंब झाल्यानं पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उशीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे.