Mumbai Central Railway Mega Block :  गणेशोत्सवात मेगाब्लॉकचा फटका !
Mumbai Central Railway Mega Block : गणेशोत्सवात मेगाब्लॉकचा फटका ! लालबाग, चिंचपोकळीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय, 'या' स्थानकावर थांबणार गाडी Mumbai Central Railway Mega Block : गणेशोत्सवात मेगाब्लॉकचा फटका ! लालबाग, चिंचपोकळीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय, 'या' स्थानकावर थांबणार गाडी

Mumbai Central Railway Mega Block : गणेशोत्सवात मेगाब्लॉकचा फटका ! लालबाग, चिंचपोकळीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय, 'या' स्थानकावर थांबणार गाडी

राज्यासह मुंबईत मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या सी एस एम टी ते विद्धविहार स्थानकवर डाऊन धिम्या मार्गांवर आज सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात मेगा ब्लॉक असणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mumbai Central Railway Mega Block : राज्यासह मुंबईत मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. आज शनिवारी 30 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात मेगा ब्लॉक राहणार असून यामुळे कामावर जाणाऱ्या तसेच गणपतीसाठी बाहेर जाणाऱ्या भाविकांचे मात्र हाल होणार आहे.

शनिवारी बहुतेक कामगार वर्गाला सुट्टी असते. त्यामुळे अनेकजण गणपतीला बाहेर जाण्याचा विचार करतात. त्यामुळे लालबाग, चिंचपोकळी स्ठानकावर नागरिकांची जास्तीत जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सी एस एम टी ते विद्धविहार स्थानकवर डाऊन धिम्या मार्गांवर आज सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात मेगा ब्लॉक असणार आहे. दरम्यान गणपतीला बघायाला जाणाऱ्या भाविकांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.

मध्यरेल्वेची उपनगरीय रेल्वे मार्गावर करिरोड आणि चिंचपोकळीचा लोकल थांबा रोखण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानक महत्वाची आणि सोयीची आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com