Education Budget 2024: अर्थसंकल्पातून शिक्षणासाठी केल्या 'या' घोषणा?

Education Budget 2024: अर्थसंकल्पातून शिक्षणासाठी केल्या 'या' घोषणा?

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Published by :
Dhanshree Shintre

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले की, देशात आणखी नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार आहेत. सध्याच्या जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याबाबत सूचना देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. आमचे सरकार सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा विचार करत आहे. असे ते म्हणाले आहेत.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमच्या सरकारने 7 आयआयटी, 16 ट्रिपल आयटी, 7 आयआयएम आणि 15 एम्स आणि 390 विद्यापीठे स्थापन केली. स्किल इंडिया मिशनचा 1.4 कोटी तरुणांना फायदा झाला. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com