Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी 'हे' महत्त्वाचे मुद्दे मांडले

Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी 'हे' महत्त्वाचे मुद्दे मांडले

केंद्रीय अर्थसंकल्प 2025: निर्मला सीतारामण यांनी युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले. एआय अभ्यास केंद्रे, IIT सोयी आणि कौशल्य विकास केंद्रांची घोषणा.
Published by :
Prachi Nate
Published on

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष दिले जाणार आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

युवकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी कोणत्या गोष्टी सांगितल्या जाणून घ्या...

1. एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारणार त्याचसोबत कृषी आरोग्य आणि इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर होणार

2. गेल्या 10 वर्षांत 23 आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता 65 हजाराहून 1.35 लाखांपर्यंत वाढली आहे. ही वाढ 100 टक्के इतकी आहे.

3. 2014 नंतर सुरू झालेल्या 5 आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार

4. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधांध्ये वाढ

5. पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५० लाख अटल टिंकरिंग लॅब उभ्या केल्या जाणार.

6. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.

7. युवकांना उत्पादन क्षेत्रात काम करता यावे म्हणून कौशल्य विकास तसेच कौशल्य प्रशिक्षणाकरता 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार

8. शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये भारतीय भाषा पुस्तक योजना सुरु होणार, याद्वारे पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेता येतील आणि शिक्षण सोपं जाईल.

9. वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवणार तसेच पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागांमध्ये वाढ

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com