Union Budget 2024: अर्थमंत्र्यांच्या भाषणातील 'हे' आहेत महत्वाचे मुद्दे

Union Budget 2024: अर्थमंत्र्यांच्या भाषणातील 'हे' आहेत महत्वाचे मुद्दे

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Dhanshree Shintre

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या.

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील 'हे' आहेत महत्त्वाचे मुद्दे

1. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ 78 लाख लोकांना मिळणार आहे.

2. 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत.

3. सर्वसामान्यांचे सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.

4. दहा वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले.

5. 10 वर्षांत 149 नवीन विमानतळे बनवली जाणार आहे.

6. मुद्रा योजनेंतर्गत महिलांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले.

7. 9 ते 14 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.

8. सरकार GDP कडे लक्ष देत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.

9. 70 टक्क्यांहून अधिक घरे पीएम आवास अंतर्गत महिलांना दिली जाणार आहे.

10. पीएम पीक विमा योजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

11. 1 कोटी घरांना सौर उर्जा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

12. विमानतळाची संख्या दुपट्टीने वाढवली आहे.

13. 517 नवीन विमान मार्गांचा प्रस्ताव मांडला आहे.

14. वंदे भारतमध्ये 40 हजार रेल्वे कोच बदलण्यात येणार आहे.

15. रक्षा विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे.

16. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भर, नवीन रोजगार निर्माण होणार आहे.

17. पुढील 5 वर्षात ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com