Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या 'या' बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू
मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आले आहे. राज्यातले ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाचा पत्ता कटा झाला आहे. तसेच, भाजपचे नेते आणि माजी मंत्री डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची संधी हुकली आहे.
शिवसेनेतून माजी मंत्री, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना देखील संधी मिळाली नाही. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही संधी हुकली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. शिवसेनेच्या तानाजी सावंतांना डच्चू दिला गेला. तर भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांच्याही पदरी निराशा पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा अत्राम यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.