Uddhav Thackeray : 'या' शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायला हवं,उद्धव ठाकरेंनी केली सरकारकडे ही मागणी
थोडक्यात
ठाकरेंनी मराठवाड्यात जाऊन अतिवृष्टीभागातील शेतकऱ्यांची भेट घेतली
उद्धव यांनी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील दारूण परिस्थिती कथन केली
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायला हवं,उद्धव ठाकरेंनी केली सरकारकडे ही मागणी
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात जाऊन अतिवृष्टीभागातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्या भयाण परिस्थितीबद्दल पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सांगत होते. पीकं उध्वस्त झाली , जमीनी खरडून गेल्या, मुलांच्या वह्या, दप्तर वाहून गेली, थोडक्यात सांगायचं तर त्यांचं अख्खं आयुष्यच वाहून गेलंय, अशा शब्दांत उद्धव यांनी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील दारूण परिस्थिती कथन केली. या शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगरातून बाहेर काढा, असं म्हणत त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा पुनरुच्चार केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
गेल्या आठवड्यात मी, काही सहकाऱ्यंसह एक दिवसाची मराठवाड्याची भेट घेतली. या वेळची आपत्ती भयाण आणि भीषण आहे. आभाळ फाटलं म्हणजे काय ही दाखवणारी परिस्थिती आहे. आत्ताही मराठवाड्यात पाऊस आहे. पावसाने शेतकऱ्याच्या, आपल्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेकांच्या जमीनी खरवडून निघाल्या, पीकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेली. मुलाबाळांच्या वह्या, पुस्तक, दप्तरं, अख्खं आयुष्य वाहून गेलं.संकटात भर म्हणून डोक्यावर कर्जांच ओझं आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक होत होत्या, तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या हातात सोयाबीन, कापूस वगैरे पीक होतं, आत्ताचचं सरकार तेव्हा होतं, पण हमीभाव देत नव्हते, त्यामुळे असंतोष होता . हमीभाव खूप कमी मिळत होता म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता. दुर्दैवाने आता , होत्याचं नव्हतं झालं, जे पीक हाताशी आलं, ते पूर्ण उद्ध्वस्त झालं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील दारूण परिस्थिती कथन केली.
या शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून, संकटातून बाहेर काढायला हवं
तेथील शेतकरी माझ्याशी हक्काने बोलले. तुम्ही जशी कर्जमाफी केली, तशीच कर्जमाफी करायला या सरकारला भाग पाडा, अशी मागणी ते आवर्जून सांगत होते. आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून, संकटातून बाहेर काढायला हवं. सरकारने जी मदत जाहीर केली ती खूप तुटपुंजी आहे, त्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस शेती उध्वस्त झाली , त्याला नुकसानभरपाई दिली, तो शेतकरी कसातरी तग धरू शकतो. पण यावेळेस तर शेतजमीनच खरवडून गेली आहे, आजूबाजूने वाहणाऱ्या नद्यांचं पाणी शेतात घुसलं आणि जमीनीवरचं पीक तर गेलंच पण, तिथली मातीही गेली. तिथले दगड, गोटे, मुरूम हे सगळे वर आलेत. ती जमीन सावरायची झाली, पुन्हा पीक घ्यायचं झालं तर किमान 3 ते 5 वर्ष लागू शकतात, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही परिस्थिती पाहता, सरकारने केलेली मदत ही जेमतेम हेक्टरी 7-8 हजार रुपये अशी मदत होईल. पण जमीन साफ करायलाच खूप पैसे लागणार, मेहनत लागणार. त्यानंतर तो शेतकरी पुन्हा पीक काढायला जाईल, 2-3 वर्ष यात जातील, पण आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे, ते तो कसा फेडेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.