'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा

'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेलं GSB सेवा मंडळ चर्चेचा विषय ठरत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेलं GSB सेवा मंडळ चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईतील किंग्स सर्कल येथील GSB सेवा मंडळाने तब्बल 316.4 कोटींचा विमा उतरावला आहे. एकूण विम्यापैकी 31.97 कोटींची रक्कम बाप्पाच्या सोनं, चांदी आणि इतर दागिन्यांसाठी रिस्क इंश्युरन्स म्हणून ठेवली गेली आहे. या विम्याचा एक मोठा भाग हा मंडळात काम करणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांची उतरवला गेल्याचं मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ GSB सेवाचे प्रवक्ता अमित पै यांनी सांगितलं.

मंडळात काम करणारे कार्यकर्ते, पुजारी, आचारी, व्हॅले पार्किंगसाठी नियुक्त कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांसाठी तब्बल 263 कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. तसेच मंडळातील मंडप, मैदान आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 20 कोटींचा विमा उतरवला गेला आहे. यावेळी भाविकांना बाप्पाचं दर्शन सुलभ होण्यासाठी तब्बल 3300 स्वयंसेवक वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करणार आहेत.

'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा
विशेष महत्व असलेले ‘हरितालिके’चं व्रत का करतात?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com