Uddhav Thackeray On BJP : 'ही बोगस जनता पार्टी'
Uddhav Thackeray On BJP : 'ही बोगस जनता पार्टी'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती आरोप Uddhav Thackeray On BJP : 'ही बोगस जनता पार्टी'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती आरोप

Uddhav Thackeray On BJP : 'ही बोगस जनता पार्टी'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती आरोप

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला: 'ही बोगस जनता पार्टी', मत चोरी रोखण्याची गरज.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Uddhav Thackeray vs BJP : राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ही बोगस जनता पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या. प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत. जे जिंकले आहेत त्यांचे ढोंग राहुल गांधींनी उघडे पाडले आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

ठाकरे म्हणाले की, कबुतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तींसाठी लोक रस्त्यावर उतरतात, ही चांगली बाब आहे; पण पहलगाम हल्ल्यात जेव्हा आपल्या जवानांचा बळी गेला, विधवांच्या कपाळावरील सिंदूर पुसला गेला, तेव्हा माणुसकी कुठे जाते? “देशाची टीम पाकिस्तानविरुद्ध खेळणार, जय शाह एवढा कोण लागतो? रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशाच्या सैनिकांचे शौर्य गाजवून भाजप त्यांचे श्रेय घेत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले. “सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “जगभर आपल्या शिष्टमंडळांनी दौरे केले, पण एकही देश भारताच्या बाजूने उभा नाही,” असे म्हणत ठाकरे यांनी केंद्राची परराष्ट्रनीतीही अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले.

रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यावर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता, अशी ऐतिहासिक आठवण करून देत ठाकरे म्हणाले, “आज पाकिस्तान व चीन एकत्र आहेत, त्यांचा ठाम निषेध करण्याची हिंमत दाखवा. पण हे न शिकल्याचा परिणाम आहे. यांना योग्य शिक्षक मिळाले असते तर देशाची अशी अवस्था झाली नसती.”

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनाला दिलेल्या आश्रयावरूनही त्यांनी केंद्रावर निशाणा साधला. “बांगलादेशींना विरोध करता, पण तिथून पलायन केलेल्या भ्रष्ट नेत्यांना आसरा देता. उपमुख्यमंत्री पदांसारख्या जबाबदाऱ्या भ्रष्टांना देता, हे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

“भाकडकथा करून जनतेला फसवू नका. प्रामाणिक निवडणूक झाली तर भाजप महाराष्ट्रात टिकणार नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com