Prawn Bhaji : आता बनवा साधा आणि सोप्या पद्धतीने कोळंबीची भजी
काही दिवसांत पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात गरमागरम भजी बनवले जातात. त्यामध्ये कांदा, बटाटा, पालक, मिक्स भाज्यांची भजी अनेक प्रकारच्या भजीचा समावेश असतो. आता पावसाळ्यात तयार करा कोळंबी भजी. तसेच ही भजी तुम्ही कोणत्याही पार्टी किंवा खास प्रसंगी बनवू शकता.
साहित्य:
2 वाटी कोळंबी
2 मोठे कांदे, पातळ चिरलेले
1 चमचा हळद
1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा धणे
1 चमचा आले-लसूण पेस्ट
2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या
2 चमचे तेल
मीठ आवडीनुसार
बेसन पीठ (आवश्यकतेनुसार)
तेल, तळण्यासाठी
कृती:
प्रथम कोळंबी व्यवस्थित नीट धूऊन आणि सोलून घ्या. कोळंबीमधला काळा धागा आठवणीने काढा. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेल्या कांद्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, धणे, आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा.
मसाला आणि कांद्यात कोळंबी घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. एका बाऊलमध्ये बेसन पीठ, मीठ आणि थोडं पाणी घेऊन मिश्रण तयार करा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करा आणि कोळंबीचे मिश्रण बेसन पिठामध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्या. गरमागरम कोळंबीची भजी सर्व्ह करा.
टीप: भजी अधिक कुरकुरीत करण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडं तांदळाचे पीठ किंवा रवा देखील घालू शकता.