Train accident at Dadar StationTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मध्य रेल्वेमध्ये दोन मेल समोरासमोर; ह्या गाड्या झाल्या रद्द
काल (15-04-2022) रात्री मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्सप्रेसला धडक दिली. दरम्यान, काही गाड्या रद्दही झाल्या आहेत.
काल (15-04-2022) रात्री मध्य रेल्वेवरील (Central Railway) दादर (Dadar) आणि माटुंगा (Matunga) रेल्वे स्थानकांदरम्यान गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्सप्रेसला धडक दिली. झालेल्या ह्या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय बैठक नेमली गेली आहे. ह्या समितीची चौकशी संपल्यानंतर अहवात मध्य रेल्वेला सादर केला जाणार आहे. ह्या अपघातामध्ये रेल्वेचे 3 डबे रुळावरून घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता ट्रॅक फिटनेसचं काम युद्धपातळीवर सुरू असून, दुपारी 12 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काही गाड्या रद्दही झाल्या आहेत.
ह्या गाड्या झाल्या रद्द:
दादर शिर्डी साईनग
मुंबई नांदेड तपोवन
मुंबई-पुणे इंद्रायणी
हावडा मुंबई गीतांजली
मडगाव-मुंबई मांडवी
करमळी-मुंबई तेजस
मडगाव-मुंबई जनशताब्दी
अमृतसर-मुंबई