महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी
Admin

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौरा करणार होते. मात्र तो दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे. आज, पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलला आहे. असे सांगितले.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाला असला तरी मात्र सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा पुढे ढकलला - शंभूराज देसाई
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com