Eknath Shinde : "ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही..."
Eknath Shinde : "ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही..." उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मोर्चावर उपमुख्यमंत्री शिंदेंच वक्तव्य Eknath Shinde : "ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही..." उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मोर्चावर उपमुख्यमंत्री शिंदेंच वक्तव्य

Eknath Shinde : "ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही..." उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मोर्चावर उपमुख्यमंत्री शिंदेंच वक्तव्य

"हा कसला मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अश्रु पाहून तुम्ही त्याच्या हातावर सध्या बिस्कीटचा पुडा ठेऊ शकत नाही. आम्ही त्यांचा दसरा चांगला जावा यासाठी कीट पाठवले आणि दिवाळी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. कसला हंबरडा मोर्चा , ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही, ते हंबरडा मोर्चा काढतात आहे. "
Published by :
Riddhi Vanne
Published on

Eknath Shinde On UBT Shivsena Hambarda Morcha : शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा आणि शासनाच्या धोरणांविरोधात हा मोर्चा आयोजित केले होते. .ठाकरे गटाकडून या मोर्चाद्वारे मोठ्या घोषणा आणि शक्तिप्रदर्शनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासह उबाठा शिवसेनेसोबत अनेक नेते उपस्थित राहिलो होते. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, "हा कसला मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अश्रु पाहून तुम्ही त्याच्या हातावर सध्या बिस्कीटचा पुडा ठेऊ शकत नाही. आम्ही त्यांचा दसरा चांगला जावा यासाठी कीट पाठवले आणि दिवाळी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. कसला हंबरडा मोर्चा , ज्यांनी कधी उंबरटा ओलांडला नाही, ते हंबरडा मोर्चा काढतात आहे. सत्ता केली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची केली तेव्हा हंबरडा फोडला. आता देखील पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर केले राजकारण आहे. शेतकरी संकटात असताना कोणीही राजकारण करु नये."

शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे

"शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही नेहमी उभे आहोत. प्रधानमंत्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विश्वास दिला आहे की, संकट मोठं असले तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com