मुंबई-गोवा महामार्गावर 'या' तारखेपासून तीन दिवस ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर 'या' तारखेपासून तीन दिवस ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. 11 जुलै ते 13 जुलै या तीन दिवसांत हा ब्लॉक घेतला जाणार असून सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 अशा दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे.

कोलाडजवळील पूई येथे नवीन पुलाचे गर्डर टाकण्याच्या काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

त्यामुळे आता नवीन पुलाचे गर्डर टाकण्याच्या काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी अशी अधिसूचना जारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com