कोकण रेल्वे मार्गावर आजही तीन तासांचा 'मेगाब्लॉक'

कोकण रेल्वे मार्गावर आजही तीन तासांचा 'मेगाब्लॉक'

रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार
Published by :
Team Lokshahi
Published on

निसर शेख, रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी २५ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४ यावेळेत ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

०२१९७ क्रमांकाची कोईमतूर-जबलपुर स्पेशल सोमवारी मडगाव ते संगमेश्वर विभागादरम्यान अडीच तासांसाठी थांबवण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी - दिवा एक्सप्रेस सावंतवाडी ते संगमेश्वर विभागादरम्यान २ तासांसाठी, तर १०१०४ क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर विभागादरम्यान १ तास थांबवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com