Attack on Tushar Hambir
Attack on Tushar HambirTeam Lokshahi

Pune Breaking: तुषार हंबीर हल्ला प्रकरणात पुणे पोलिस दलातील तीन पोलीस शिपाई निलंबित

हल्या दरम्यान निलंबीत पोलिस हे आपल्या कर्तव्यावर आढळून आले नसल्याने केलं निलंबीत.
Published by :
Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: 5 सप्टेंबरला हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला करणाऱ्या व्यक्ती अज्ञात होत्या. दरम्यान, हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी या हल्यात गंभीर जखमी झाले होते.

रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं आहे. तुषार हंबीर हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली आहे.

तुषार हंबीरची पार्श्वभुमी:

खून आणि खूनाच्या अनेक गुन्ह्यात तुषार हंबीर हा सध्या येरवडा कारागृहात होता त्याला वैद्यकीय उपचारासाठी 28 ऑगस्ट पासून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तुषार हंबीर याच्यावर पाच तारखेला रात्री दहाच्या सुमारास तलवार आणि पिस्टल घेऊन अक्षय ओव्हाळ आणि त्याच्या साथीदारांनी केला होता हल्ला.

Attack on Tushar Hambir
Pune Breaking: शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

निलंबनाचं कारण काय?

हल्ल्यादरम्यान पोलीस शिपाई पांडुरंग कदम सिताराम कोकाटे आणि राहुल माळी हे तुषार हंबीरऱ्याच्या बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस शिपाई होते गैरहजर, हल्या दरम्यान निलंबीत पोलिस हे आपल्या कर्तव्यावर आढळून आले नसल्याने उपायुक्तांने हलगर्जी पणाचा ठपका ठेवत ३ पोलिस शिपायांना केलं निलंबीत

कसा झाला होता हल्ला?

उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर तुषार हंबीरला पहाण्यासाठी आल्याचा बहाणा करून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, फायरिंग चुकली असता हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत हंबीर याच्यावर खुनी हल्ला केला. फायरिंग करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर कोयत्याने खुनी हल्ला करत असताना पोलिस कर्मचारी अमोल बगाड यांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बगाड हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनोपुर्वीहा पुर्वीही तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com