गणपतीक गावाक जाऊचा हा; 'या' ठिकाणावरुन विशेष गाड्या सोडण्यात येणार; पाहा वेळापत्रक

गणपतीक गावाक जाऊचा हा; 'या' ठिकाणावरुन विशेष गाड्या सोडण्यात येणार; पाहा वेळापत्रक

कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात.

कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीला गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरु असते. गाड्यादेखिल फुल्ल असतात. याच पार्श्वभूमीवर आता पुणे रेल्वे स्थानकावरुन कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

१५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकामधून सुटणार आहे. ही गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे. तर कुडाळ-पुणे रेल्वे १७ व २४ सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटेल. या गाड्यांना राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, पुणे, रत्नागिरी, आडवली या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com