Delhi
Delhi

Delhi : शिक्षकांच्या जाचाला कंटाळून सांगलीच्या मुलाने दिल्लीत जीवन संपवलं; 4 शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल

दहावीत शिकणाऱ्या मुलाने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Delhi) दहावीत शिकणाऱ्या मुलाने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा मुलगा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे.

शौर्य प्रदीप पाटील असे या विद्यार्थ्यांचे नाव असून शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने जीवन संपवत त्यासोबत दीड पानाची सुसाइड नोट लिहिली असल्याची माहिती मिळत आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून खाली रस्त्यावर उडी मारून जीवन संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्या मुलाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याच्यााधीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. याप्रकरणी आता 4 शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं

  • शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं

  • 4 शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com