Todays Mega Block : पश्चिम रेल्वेचा तब्बल इतक्या तासांचा मेगा ब्लॉक, प्रवाशांना मनस्ताप

Todays Mega Block : पश्चिम रेल्वेचा तब्बल इतक्या तासांचा मेगा ब्लॉक, प्रवाशांना मनस्ताप

आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली आणि कांदिवलीदरम्यान पूल क्रमांक 61 वरील गर्डरची आणि अन्य कामांसाठी पश्चिम रेल्वेने 26 एप्रिल शनिवारपासून 35 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होईल.

काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे. आज रविवारी दिवसभरात 90 फेऱ्या रद्द राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. यामुळे 26 एप्रिल रोजी 73 आणि 27 एप्रिल रोजी 90 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 163 लोकल फेऱ्या रद्द असतील.

त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतंतसेच मध्य रेल्वेवर आज विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गावर सकाळी 8.00 वाजल्यापासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्याचसोबत हार्बर रेल्वे मार्गावर मेगा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते चुनाभट्टी, वांद्रे स्टेशनदरम्यान अप हार्बर आणि डाऊन मार्गावर 11.10 वाजल्यापासून ते 04.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com