ताज्या बातम्या
Lalbaugcha Raja Pratham Darshan Sohala : लालबागनगरीची प्रतीक्षा संपली! आज होणार 'राजाचं' प्रथम दर्शन; जाणून घ्या वेळ काय?
याचपार्श्वभूमिवर संपुर्ण लालबागनगरी आणि मुंबईकरांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आज उगवला आहे. आज लालबागच्या राज्याचे प्रथम दर्शन भक्तांना मिळणार आहे.
मुंबईतील लालबाग परळ भागामध्ये आज गणेश भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळणार आहे. कारण, आज गणेशोत्सव सुरू होण्याआधीचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे लालबाग परळ या संपूर्ण परिसरामध्ये अनेक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे. आज अनेक मानाच्या सार्वजनिक गणपती मंडळांचा आगमन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आजचा रविवार हा बाप्पावार ठरणार आहे.
सध्या परळच्या कारखान्यात तयारी सुरु आहे. याचपार्श्वभूमिवर संपुर्ण लालबागनगरी आणि मुंबईकरांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आज उगवला आहे. आज लालबागच्या राज्याचे प्रथम दर्शन भक्तांना मिळणार आहे. आज सायं. 7 वाजता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन होणार आहे.