बातम्या
आज काँग्रेसचा राजभवनावर धडक मोर्चा; ED,CBIच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
आज काँग्रेसचा राजभवनावर धडक मोर्चा
आज काँग्रेसचा राजभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ED,CBIच्या विरोधात काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे. गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.