आज 74 वा प्रजासत्ताक दिन,  विविध कार्यक्रमांचं आयोजन

आज 74 वा प्रजासत्ताक दिन, विविध कार्यक्रमांचं आयोजन

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले.

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.

आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. संचलनाबरोबर येथे भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत.देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईत कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. मुंबईत ठिकाठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे.या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com